आता या योजनांचे शेतकऱ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये वार्षिक मिळणार यादीत नाव पहा
केंद्र सरकार पीएम किसान योजने प्रमाणेच महाराष्ट्र शासनाने अधिकृत GR जारी करून 15 जून 2023 रोजी राज्यात सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केलेली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्राकडून 6,000 रुपये आणि महाराष्ट्रातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये जमा होतील. म्हणजेच शेतकऱ्याला 12,000 रुपये वार्षिक निधी मिळणार.

सदर योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष :-

1. सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.

2. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.

3. पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेसाठी लाभार्थी पात्र असतील.

योजनेची कार्यपद्धती :-

Pm Kisan पीएम किसान योजनेच्या PFMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्याकरिता पोर्टलवरुन / प्रणालीवरुन डायरेक्ट बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली :-

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी. pm ksan beneficiary

केंद्र शासनाच्या संमतीने पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.

निधी वितरणाची कार्यपध्दती :-

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर हस्तांतरण आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.

हप्ता क्रमांक कालावधी रक्कम –
1 पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै रु.२०००/-
2 दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर रु.२०००/-
3 तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च रु.२०००/-

महाराष्ट्र शासनाचा अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!