विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय पहा तर नविन जीआर प्रमाणे 4 लाख रुपये अनुदान अर्ज कुठे व कसा करायचा त्यासाठी काय प्रक्रिया आहे थोडक्यात पण संपूर्ण माहिती जाणून घेऊ बहुतांशी शेतकऱ्यांना नविन आलेले GR माहिती होत नाहीत त्यामुळे आपण वेळोवेळी नवनवीन माहिती अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत असतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार, महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं म्हटलं आहे.
त्यामुळे मग विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यासाठीची पात्रता काय आहे? यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? लाभार्थी निवड कशी होते? याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या अपडेट मध्ये पाहणार आहोत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभधारकाची निवड कशी होते?
या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
1.अनुसूचित जाती
2.अनुसूचित जमाती
3.भटक्या जमाती
4.विमुक्त जाती
5.दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
6.स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
7.विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
8.जमीन सुधारणांचे लाभार्थी
9.इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
10.सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
11.अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)
Land Record: जमिनीचे नकाशा गट नंबर टाकून पहा मोबाईलवर
लाभधारकाची पात्रता –
1.अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असावी.
2.पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.
3.दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
4.लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
5.एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा असावा.
6.एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचं सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावं.
7.अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.
अर्ज कुठे व कसा करायचा?
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जप्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
शासन निर्णयात या अर्जासाठीचा नमुना दिला आहे, तो तुम्ही खाली पाहू शकता. अशापद्धतीनं साध्या कागदावर तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र सुद्धा द्यायचं आहे. संमतीपत्राचा नमुना शासन निर्णयासोबत जोडला आहे. शासन निर्णयाची लिंक इथं देत आहोत.