महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही.
Hanuman Jayanti 2024 : विशेष म्हणजे गावात कोणी मुलाचं मारूती, हनुमान, पावनसुत अंजनपुत्र असे नाव ठेवत नाही. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो.
पडावा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते.पाडव्याचा यात्रेचा मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा कुस्त्या,तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक महाआरती अशी विविध कार्यक्रम पार पडतात. गेली पंधरा वर्षांपासून श्री. निंबादैत्य महाराज देवस्थान सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून त्यामाध्यमातून विकासाची कामे येथे सुरु आहे.लवकरच मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे.पंधरा दिवसातून एकदा दर शनिवारी दैत्य महाराजांची महाआरती होऊन अन्नदानाची महा पंगत गावासाठी व आलेल्या भाविकासांठीचा उपक्रम राबवण्यात येतो.