महाराष्ट्रातील सर्वात पवित्र गाव, 2 नद्यांच्या संगामामुळे पडले 2 भाग; इथंच आहे 400 वर्ष जुनं प्राचीन मंदिर

आपण आशा एका ठिकाणची माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा इतिहास आणि महत्व अनेकांना माहितीही नसेल अशा एका ऐतिहासिक गावाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. ते गांव म्हणजे माहुली. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे माहुली गावाचे दोन भाग पडले आहेत. अलीकडे ‘संगम माहुली’ आणि पलीकडे ‘क्षेत्र माहुली’.

 

 

छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे आहे. यामुळे या स्थळाला ऐतिहासीक वारसा देखील लाभलेला आहे.

 

 

देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनीच्या मुर्त्या आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत.मंदिरासमोर नंदीमंडप आहे त्यावर अष्टकोनी शिखर आहे.

 

 

तारकाकृती असणाऱ्या या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ असून दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूने मोकळा आहे.

 

 

संगम माहुली येथे 400 वर्ष जुनं विश्वेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे.

संगम माहुली हे महाराष्ट्रातील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. राज्य भरातून अनेक भाविक येथे धार्मिक विधी तसेच अस्थी विसर्जासाठी देखील येतात.

 

साता-यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. संगम माहुली हे तीर्थक्षेत्र आहे. येथेच 400 वर्ष जुनं प्राचीन मंदिर आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे पहा

 

Home

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!