वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढतात? वंशावळ काढण्याचा अधिकार कोणाला आहे?
cast validity document वंशावळ म्हणजे काय-
अगदी सरळ सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास होय,आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती ही वंशावळीत नमूद केलेली असते.

वंशावळ काढण्याचा
अधिकार कोणाला आहे?

namo Kisan Yojana 2nd instalment:”या” दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा 2 रा हफ्ता, पात्र शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये,येथे पहा यादी

प्रत्येक व्यक्तीचं नाव आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ असे म्हणत असतात.

खापर पणजोबा किंवा आजोबापासून आपल्या पिढीत आपण ही नावं लिहू शकतो. यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं म्हणत असतात.

 

वंशावळ कोण काढू शकतो?अर्ज कुठे करायचा पहा

 

वंशावळ कशी काढतात –
आपल्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं वंशावळ काढण्यासाठी आपल्याला लिहावी लागतात.

अगोदर खापर पणजोबाचे नाव लिहावे लागते , मग पणजोबाच नाव , त्यानंतर आजोबा नाव लिहावे लागेल , नंतर आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.
वंशावळ ही ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत लिहावी लागत असते.

Solar Rooftop Online Application: घरावरील सोलार बसविण्यासाठी सरकारचे अनुदान; असा करा अर्ज व मिळवा कायमची वीज बिलातून कायमची मुक्तता.

तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये याचा रेकॉर्ड आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास आपल्याला मिळत असतो.
याशिवाय, पूर्वजांच्या जातीचा जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही उल्लेख आढळत असतो. आपले आजोबा शिकलेले असतील आणि त्यांनी त्यावेळी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आपल्याला आढळून येत असते.

वंशावळ कशासाठी लागते-cast validity document
आताच्या जन्म नोंदींसमोर व नावासमोर आपली जात लिहिली जात नसते केवळ आपले आडनाव लिहिलं जातं असते.
पण जातीचं प्रमाणपत्र कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना काढावं लागतं असते,त्यासाठी आपल्याला जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागत असतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये आपल्या नावासमोर जातीचाच उललेख केलेला असायचा.
याशिवाय, आपल्याला जात पडताळणीसाठीही वंशावळ लागत असते.

वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची-
अर्जदाराची स्वत:ची वंशावळ काढण्याची जबाबदारी असते.वंशावळ ही स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून आपली वंशावळ लिहायची असते.
वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करण्याची आपल्याला गरज नसते.
वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती पहा.

वंशावळ कोण काढू शकतो?वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!