राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं, असा सल्ला डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी. उडीद, सोयाबीन ही पीकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत. 21 तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे. पण त्याआधी कोरडं हवामान असणार आहे. त्यामुळे काळात काढणीला आलेली पिकं काढून घ्या, असं सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच 1 आणि 2 ऑक्टोबरला चांगला पाऊस होईल. त्यानंतर 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे. 5 नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केलाय.