Farming scheme शेती न करता कमवा हेक्टरी सव्वा लाख रुपये, शिंदे सरकारची खास योजना,
राज्य सरकारच्या खास योजनेत शेतकऱ्यांना आता हेक्टरी सव्वा लाख रुपये मिळणार आहेत. पाहा काय आहे योजना?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने फायद्याची योजना सुरू केली आहे. आपली जमीन सरकारला भाड्याने दिल्यास हेक्टरी 1लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही नवीन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी भाड्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 75 हजार ऐवजी एक लाख 25 हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहेत. शिवाय दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ राहणार आहे.
काय आहे सौर कृषी वाहिनी योजना?
शेतकऱ्यांची सोय आणि त्यांच्या मागणीनुसार कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या वतीने मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होती. त्या योजनेस राज्यात चांगला प्रतिसाद राहिला. दरम्यान 8 मे 2023 पासून राज्य शासनाने या योजनेस अधिक व्यापक स्वरूप देत लोकसहभाग वाढवण्याचा निर्णय झाला.त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना 2.0 या नावाने योजना पुढे सुरू ठेवली आहे. या नव्या योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजारांऐवजी एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. शिवाय यामध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे.
👉योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यावा? कागदपत्रं,अर्ज संपूर्ण माहिती येथे पहा