सोन्याच्या दरात हळूहूळू घट होत आहे. आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,२४७ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारच्या बंदच्या तुलनेत हा दर ९१ रुपयांनी कमी आहे. काल प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ५९,३३८ रुपयांवर बंद झाला होता.

त्यात आज घट दिसून आली. दरम्यान, चांदीचा दर ५२४ रुपयांनी कमी झाला आहे. आज चांदीचा दर प्रति किलो ७०,५२७ रुपयांवर खुला झाला. काल हा दर ७१,०५१ रुपयांवर बंद झाला होता. (Gold Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार (India Bullion & Jewellers Association), आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९,२४७ रुपये, २३ कॅरेट ५९,०१० रुपये, २२ कॅरेट ५४,२७० रुपये, १८ कॅरेट ४४,४३५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३४,६६० रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७०,५२७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

सध्याचा सोन्याचा दर हा सर्वकालीन उच्चांकाच्या २,३३८ रुपयांनी कमी आहे. सोन्याचा दर ११ मे २०२३ रोजी ६१,५८५ रुपयांवर पोहोचला होता. आता दर हळूहळू कमी होत आहे. (Gold Price Today)

एमसीएक्सवर सोन्याचा दर

मल्टि कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने तेजीत व्यवहार करत आहे. ५ ऑक्टोबर २०२३ चा सोन्याचा फ्युचर्स ट्रेड ६५ रुपयांच्या वाढीसह ५९,३१३ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा फ्युचर्स ट्रेड ३२४ रुपयांच्या वाढीसह ७०,५४० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. Gold Rate Today

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

सोन्याच्या सध्याच्या किंमती? किती घट जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!