Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ५ जून, १९९२ रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली.

या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास लघु सिंचन, पडीक जमीन विकास यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक ही केंद्र पुरस्कृत योजना, तसेच आदर्श गाव योजना या महत्वपूर्ण राज्य शासन पुरस्कृत योजनांचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यात येते. याच मृद व जलसंधारण विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत जवळपास ६७० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग जलसंधारण अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व जलसंधारण विभाग भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

 संपूर्ण जाहिरात व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मृद व जलसंधारण विभाग भरती २०२४

एकूण रिक्त पदे – ६७०

पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब.

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

भरतीसाठी अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ/ दिव्यांगांसाठी – ९०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.

हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! एनडीए व नौदल अकादमी अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २१ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट –

https://swcd.maharashtra.gov.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा Pdf येथे पहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!