State Board 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

MSBSHSE Board Exam Time Table माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल. Board exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.

माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाई परीक्षा (१२वी) – बुधवार, दि. २० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) – शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.

तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!