Mahabhumi Land Record: तुकड्यातील जमिनीच्या दस्त नोंदणीचा निर्णय सात दिवसात

Mahabhumi Land Record राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असून देखील जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर तुकड्यातील एक दोन गुंठे जमीन यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यासाठी बंदी घालण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या जमिनीची खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन म्हणजेच Layout करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

👉नवीन शासन निर्णयानुसार विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4लाख रुपये

मात्र त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या दस्त नोंदणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येथे आठ दिवसात याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार आहे. mahabhumi land record त्यानंतरच तुकड्यातील जमिनीची दस्त नोंदणी होईल किंवा कसे हे स्पष्ट होणार आहे.

Land transfer record: जमीन वाटणी करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णया नुसार

Mahabhumi Land Record नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडे बंदी तुकडे जोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रस्तुत केले. त्यानुसार एक दोन तीन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या वाचा –
Mudra Loan SBI : मुद्रा लोन योजनेत वाढ आता मिळणार १० लाख रु कर्ज

महाभुलेख 7/12 उतारा व 8-अ मालमत्ता पत्रक काढा ऑनलाईन पहा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!