Land transfer record: जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णया नुसार
Land And Property Transfer: आता वडिलोपार्जित जमीन (Land For Sale) किंवा संपत्ती तुमच्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. असा शासनाचा Maharashtra Land Record नवीन जीआर आलेला आहे. वडिलोपार्जित जमीन ही फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम पेपर वर तुमच्या नावावर होऊ शकते. त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि अर्ज कुठे करावा या बद्दलची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे. वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी. शेती नावावर कशी करावी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

वडिलोपार्जित जमीन (Ancestral land) नावावर करताना अनेक अडचणी येत असतात .वेळ खूप jat असल्याने आणि त्याचबरोबर पैशाची देखील खूप नासाडी होत असल्यामुळे बहुतांशवेळा लोक कंटाळा करतात. आणि या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत ही गोष्ट नंतर करू, नंतर करू, या विचाराने पुढे ढकलतात. पण, बहुतेक वेळा वेगळ्याच काही समस्या यातून उद्भवत असतात. आणि परिणाम म्हणजे आपल्याला आपलीच वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमीन गमवावी लागते.

या सगळ्या अडचणी येऊ नये आणि अशा प्रकारच्या घटना देखील घडू नये म्हणून सरकारने नवीन शासन निर्णय (GR)काढलेला आहे. तर हा शासन निर्णय (GR) नेमका आहे तरी काय? आणि जमीन नावावर करण्यासाठी एकूण किती खर्च लागणार? या सर्व बाबत या माहिती पाहु. त्यामुळेच हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

जुन्या शासनाच्या कायद्यानुसार;

जुन्या पद्धतीनुसार किंवा जुन्या शासनाच्या कायद्यानुसार विचार केला तर वडिलोपार्जित जमीन (Ancestral land) मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी जमिनीच्या किंवा संपत्तीचा बाजारभावानुसार किमतीच्या मुद्रांक शुल्क आपल्याला शासनाला द्यावा लागत होता. पण नवीन शासन निर्णय (GR) नुसार आपल्याला फक्त 100 रुपये शुल्क लागणार आहेत .शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर आपण तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. वडिलोपार्जित जमीन (Ancestral land) म्हणजे आपल्या वडिलांची अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची तिच्या मरणानंतर नव्या वारसदाराच्या नावावर हस्तांतरित करणे आताच्या नवीन प्रक्रियेनुसार खूपच सोपे झाले आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी काय तरतूद आहे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहा, महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.

जमिनीचे सातबारा उतारे मालमत्ता पत्रक काढा ऑनलाईन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!