Agriculture News : जिल्ह्यातील ५५८५ शेतकऱ्यांच्या पीकविमा परताव्याचा मुद्दा गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित होता. त्यांना परतावा देण्यासंदर्भातील प्रक्रिया विमा कंपनीकडून (agriculture insurance) हाती घेण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उर्वरित १७ हजार शेतकऱ्यांना देखील लवकरच परतावा मिळेल, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली. pmfby

गेल्या खरीप हंगामात संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित एक लाख २५ हजार ९०२ शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या.

Crop insurance: या दहा जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर येथे पहा

कंपनीद्वारा त्यापैकी ९९,५१८ पूर्वसूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ६१ हजार २८५ शेतकऱ्यांना ६६.८२ कोटीचा परतावा आतापर्यंत कंपनीद्वारे देण्यात आला आहे. अद्यापही २३ हजारांवर बाधित शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नव्हता.

यापैकी ५५८५ शेतकऱ्यांना या महिनात परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Crop Insurance : या शेतकऱ्यांच्या खात्यात दोनदा विमा मग रक्कम गोठवली;खाते होल्ड विमा कंपनीचा सावळा गोंधळ

या बाधित शेतकऱ्यांना कंपनीद्वारा किती परतावा देण्यात आला याची माहिती अद्याप पर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही. खरिपामध्ये पीक काढणीच्या हंगामात पिकाचे नुकसान झाल्याबाबत दहा हजार ५६७ शेतकऱ्यांना १२.८६ कोटीचा पीकविमा परतावा देण्यात आला असे सांगितले जाते. agriculture insurance

प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याला परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्याप्त आहे. crop insurance

आंदोलनामुळे कंपन्यांकडून भरपाईस सुरुवात

पीकविमा परताव्या संदर्भात विमा कंपनीकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वारंवार आंदोलन केली. त्याचीच दखल घेत विमा कंपनीकडून भरपाईसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. crop insurance

 

Crop insurance: या दहा जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर येथे पहा

 

Land record: या जिल्ह्याचे जमिनीचे रेकॉर्ड पहा ऑनलाईन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!