Loksabha result लोकसभेसाठी महाराष्ट्रात मतदान झालं व सुरु झाले अंदाज. कोण किती जागा घेईल? सत्ता कुणाची येईल? आदी चर्चा सुरु झाल्या. परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त भाव खाल्ला तो म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, नाव व चिन्ह हे सर्वच त्यांच्यापासून दुरावले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात शरद पवार यांची तुतारी किती जागा घेणार याची चर्चा सुरु झाली.

बारामती : आता या जागेपैकी पहिली जागा येते ती म्हणजे बारामती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या जागेकडे लागले आहे. यामध्ये पवार विरोधात पवार अशी झाली. येथे शरद पवारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती, तसेच फडणवीस-अजित पवार यांनी केलेला वादळी प्रचार आदी गोष्टी पाहता वातावरण काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान या जागेवर सुप्रिया सुळे निसटता विजय मिळवतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय.

सातारा : हा देखील शरद पवारांचा हक्काचा मतदार संघ आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी मैदानात उतरवले. येथे छत्रपती उदयन राजे हे त्यांच्या विरोधात आहेत. येथे देखील शशिकांत शिंदे यांची चर्चा मतदारांत जास्त असल्याचे अनेक विश्लेषक चर्चा करतात. त्यामुळे येथे तुतारी वाजण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते.

माढा : येथे भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर उभे आहेत. येथे सुरवातीला शरद पवार यांनी महादेव जानकर यांना पाठिंबा देऊन पाहिला परंतु ही खेळी अयशस्वी झाली. परंतु त्याचवेळी महायुतीमधील नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देत पवारांनी मोठे राजकारण खेळले. त्यानंतर मोहिते पाटलांचा प्रचाराचा धुराळा, पवारांच्या सभा, इतर जातीय समीकरणे मोहिते पाटलांनी जुळल्याने ते येथे प्लस मध्ये राहतील असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.

शिरूर : येथे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली. येथे आढळराव पाटील व तुतारीकडून अमोल कोल्हे यांची लढत झाली. येथे कोल्हे यांचा झंजावात व त्यास मिळालेली शरद पवारांची साथ लक्षवेधी ठरली. स्थानिकांनी देखील आढळराव पाटील यांचे काम मनापासून केले नाही अशा चर्चा आहे. त्यामुळे येथे कोळेच तुतारी वाजवत असे अनेक लोक चर्चा करत आहेत.

अहमदनगर : लक्षवेधी ठरलेली ही लढत भाजपचे सुजय विखे व तुतारीकडून निलेश लंके अशी झाली. पैसे वाटप ते बोगस मतदान आदी अनेक गोष्टी चर्चेत राहिलेल्या. येथे एकदम कांटे कि टक्कर असल्याने येथे नेमके काय होईल याबाबत भलेभलेही अंदाज वर्तवत नाहीत. परंतु निलेश लंके निवडणून येतील अशी खात्री महाविकास आघाडीला आहे.

बीड : भाजपकडून पंकजा मुंडे, तुतारीकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी ही लढत झाली. जातीय समीकरणांमुळे ही लढत लक्षवेधी ठरली. पंकजा ताईंच्या हक्काच्या मतदार संघात सोनावणे यांची तुतारी वाजणे हे पंकजा मुंडेंसाठी राजकीय धोकयाची चिन्हे असू शकतात.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

भिवंडी : शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे व भाजपकडून कपिल पाटील यांच्यात झाली. येथे दोन टर्म निवडणून येऊनही अनेक विकासकामे न झाल्याने पाटील यांच्याविरोधात नाराजगी होती असे म्हटले जात आहे. याचा फायदा बाळ्यामामा यांना होईल असे म्हटले जात आहे.

आता उरले तीन मतदार संघ यात रावेर मध्ये भाजपकडून रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील, दिंडोरी येथे महायुतीकडून भारती पवार व शरद पवार गटाकडून भास्कर भगरे उभे आहेत. येथे मात्र महायुतीची जास्त ताकद दिसेल असा अंदाज काही लोक व्यक्त करतायेत. वर्ध्यातही महायुतीची जास्त ताकद दिसेल असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत.

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!