LPG Cylinder Price: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवार १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत.
त्यात ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या शेवटच्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच १ मे रोजी मतदान होत आहे.
त्यानंतर संध्याकाळी देशात एक्झिट पोलची आकडेवारी सादर केली जाईल. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, या निकालाआधी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.