Mantri Mandal Nirnay 2023 :शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२०००, आणि १ रुपयात पीक विमा शासन निर्णय Crop insurance Nirnay 2023 शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे तर 2023 च्या बजेटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा याबरोबर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अर्थात 6000 रुपयांचे वार्षिक जी मदत आहे. ते शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत देण्यासाठीचे एक घोषणा करण्यात आलेली होती. हि घोषणा झाल्यानंतर बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटलेला होता याच पुढे काय होणार ही योजना राबवली जाणार का बरेच सारे प्रश्न पडलेले होते.

Mantri Mandal Nirnay 2023 यामध्ये एक महत्त्वाचे अशी मंजुरी बाकी होते ती म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी 30 मे 2023 रोजी एक महत्त्वाचे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. आणि याच बैठकीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असे दोन निर्णय घेण्यात आले.

एक रुपयांमध्ये पिक विमा वार्षिक 12000 हजार रुपये

Mantrimandal Nirnay 2023 :मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा नेमका निर्णय काय?

Mantrimandal Nirnay 2023 शेतकऱ्यांसाठी जो पीक विमा योजना राबवली जाते या पिक विमा योजनेमध्ये आता एक रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांना नामात्र शुल्क भरून. पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला.

Pm Kisan पीएम किसान योजनेची अंमलबजावणी

Mantrimandal Nirnay 2023 पीएम किसान योजनेची जी काही अंमलबजावणी राज्यांमध्ये केली जाते त्या धरतीवर ते बरेच सारे शेतकरी अपात्र होत आहेत.

त्याबरोबर 2019 फेब्रुवारी च्या पूर्वी ज्यांचे फेरफार आहे ते शेतकरी यामध्ये पात्र होत आहेत त्यानंतर बऱ्याच जणांचे खाते फोड झालेली आहे.

बऱ्याच जणांच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहे किंवा त्यामध्ये बरेच सारे काही हस्तांतर वगैरे झालेले आहे.

या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत पात्र केले जात नाही बऱ्याच सरळ रजिस्ट्रेशन साधारणपणे चार ते साडेचार लाख शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन त्यामध्ये मंजूर करण्यात आलेले नाही.

आणि अशा सर्व पार्श्वभूमी वर पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा काही अमुलाग्र असे बदल केले जाणार आहे.

ते राबवण्यामध्ये जे धोरण आहे ते धोरण बदलल जाणार आहे आणि यानंतर तिसर याच्यात अंतर्गत जो महत्त्वाचा असा निर्णय आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी

Mantrimandal Nirnay 2023 म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

याबरोबर पंजाबराव देशमुख जैविक मिशन जे राज्यांमध्ये राबवले जाते हे सुद्धा पुढे राबवण्यासाठी या शासन निर्णयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.

एक रुपयांमध्ये पिक विमा याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि जैविक मिशनला पुढे राबवण्याकरता आजच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा कारण एखाद्या योजनेची किंवा एखाद्या बाबीचे बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळण्याच्या अभावी त्या योजना राबवल्या जाऊ शकत नाही.

किंवा त्याचे शासन निर्णय निर्गमित केले जाऊ शकत नाहीत याच्यामध्ये 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाला 2019 डिसेंबर मध्ये घोषणा करण्यात आली होती.

परंतु 2022 पर्यंत त्याची मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्यामुळे या पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाचे वितरण करता आलं नव्हतं आणि याच पार्श्वभूमी वर मंत्रिमंडळाच्या मंजुरीचे महत्त्व कळू शकत.

आता याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यामुळे याचा जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे आणि कशाप्रकारे शेतकऱ्याला याचा अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचे.

त्यांचा पिक विमा भरण्याची जी 1 रुपया फीस आकारली जाणार आहे ते कशाप्रकारे दिली जाईल याबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये कशाप्रकारे पात्र केले जाईल.

आणि त्याचा पहिला हप्ता कधी वितरित केला जाईल या संदर्भातील सविस्तर माहिती जीआरच्या माध्यमातून दिली जाईल.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!