या योजनेअंतर्गत, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांना ६००० हजार रुपये वार्षिक देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचे मिळून १२ हजार रुपये मिळतील.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा
नमो शेतकरी योजनेचा वितरित करण्यात आलेल्या पहिल्या हप्त्यात १७१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. या योजनेसाठी या वर्षी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.’ महत्त्वाच म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेत पात्र आहेत अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु ज्या कुणाच्या काही त्रुटी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन यादीत नाव पाहू शकता.
हेही वाचा : रुफटॉप सोलर 3kw ते 7kw पॅनल बसवल्यास 80% सबसिडी
थोडक्यात महत्त्वाचे
महत्त्वाच म्हणजे अद्याप ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टल वर नोंदणी नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान पोर्टल वर नोंदणी आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे परंतु काही त्रुटी अभावी हप्ता बंद झाला आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी किंवा इतर आपल्या वैयक्तिक पातळीवर त्रुटी शोधून तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा थेट लाभ मिळेल.
या यादीत नाव पहा