PM Kisan Samman Nidhi : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदीचा बातमी आहे. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (PM Kisan Samman Nidhi) पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख ठरली आहे.
येत्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजे म्हणजे पुढच्याच आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
EKYC आवश्यक आहे कारण PM किसान योजनेचे फायदे त्यांच्या आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यापर्यंत कोणत्याही मध्यस्थाशिवाय पोहोचले पाहिजेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे.