Rain Forecast : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र पाऊस पडत आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Rain Update)

Maharashtra Rain News: अखेर वरुणराजा बरसला! नागपूरनंतर पुणे, नगर, बीडला पावसाने झोडपले; नागरिकांची तारांबळ

कोणत्या जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट?

राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. Latest Marathi News

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!