शेतीचा वाद मिटवा, फक्त दोन हजार रुपयांत ! काय आहेे योजना अर्ज प्रक्रिया ? वाचा संपूर्ण माहिती | Salokha Yojana Maharashtra
Salokha Yojana Maharashtra : शेतजमिनीबाबतचे भावकीतले वाद मिटविण्यासाठी राज्य शासनामार्फत आता ‘सलोखा योजना’ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे भाऊबंदकी, भावकीचे वाद पूर्ण संपुष्टात येतील, यासाठी ही योजना राविण्यात येत आहे.
या योजनेचा कालावधी हा दोन वर्षांसाठी असणार आहे.
जमिनीबाबतचे वाद हे. अनेक ठिकाणी भावकीत दुरावा निर्माण करणारे ठरत आहेत. या वादामुळे सख्खे भाऊही वैरी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे हे वाद संपुष्टात आणण्यासाठी मंत्रिमंडळाच्या गतवर्षी 13 डिसेंबरला झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली. land transfer record
ग्रामीण भागात जमिनीवरून अनेक वाढ आहेत. हे वाद वाढत गेल्याने शासकीय यंत्रणेची गरज पडते. तरीही हे वाद अनेक वर्षे तसेच राहतात. ग्रामीण भागातील या वादाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सलोखा योजना सुरू केली आहे.
जमिनीचे वाद मिटण्यासाठी,अर्ज कुठे व कसा करावा येथे क्लिक करा
या योजनेचा फायदा कोणाला?
पूर्वी शेतजमिनीचे छोटे तुकडे होते. कालांतराने कुटुंबे वाढत गेली , पण जमीन तेवढीच राहिली, जमिनीचे तुकडे पडून वाद निर्माण झालेल्यांना योजनेचा फायदा होईल. land record
हेही वाचा: ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 90% पर्यंत शेतकऱ्यांना सबसिडी असा करा अर्ज
काय आहे सलोखा योजना?
यात एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसच्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असलेल्या शेतजमिनधारकांच्या दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाते. mp land record
जमिनीचे वाद मिटवण्यासाठी, अर्ज कुठे व कसा करावा येथे क्लिक करा
वर्षानोवर्ष शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु असलेले भावकीचे वाद संपुष्टात आणण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या योजनेत मुद्रांकशुल्क फक्त दोन रुपये आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा भावकांच्या वादातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. – दिलीप निऱ्हाळी , दुय्यम निबंधक, कोपरगाव.
तलाठ्याकडे करा अर्ज
जमिनीच्या ताब्यावरून वाद, शेताच्या बांधावरून होणारे वाद, शेतजमिनीवरुन होणारे वाद. अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, अतिक्रमण व वहिवाटीचे वाद, वाटणी वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किवा प्रस्ताव, तसेच अमान्यतेबाबतच्या वादाबाबत तलाठ्याकडे अर्ज करता येतो.
हेही वाचा: जमिनीचे भूमिअभिलेख रेकॉर्ड पहा आता ऑनलाईन
केवळ दोन हजार रुपये खर्च
* नोंदणी व दस्त नोंदणीचे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण दोन हजार रुपये भरल्यास राज्य सरकारच्या सलोखा योजनेचा लाम घेता येतो.
* त्यासाठी दोन हजारांपेक्षा जास्त खर्च येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारी योजना आहे.
योजनेच्या अटी काय?
* ही योजना दोन वर्षासाठी असेल.
* शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान बारा वर्ष असला पाहिजे
* अकृषिक रहिवासी, वाणिज्यक यांना लागू नाही.