Viral video: पुणेकरांनो तुम्हीही जर आडराई जंगल ट्रेकला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, अचानक पाणी वाढल्यानं पर्यटक कशाप्रकारे अडकले आहेत, हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी पलीकडे अडकलेल्या तरुणाची अवस्था पाहून तुम्हालाही घाम फुटेल. हा तरुण प्रचंड घाबरलेला असून वारंवार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगितलं जात आहे; तर दुसरीकडे अंधारही पडत आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पाणी कमी होण्याची वाट पाहिली आणि जसे पाणी कमी झाले तसे त्यांना तिथून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान अशावेळी काय खबरदारी घ्यावी हे सुद्धा त्यानं सांगितलं आहे.
टिप:
१. स्वतःची काळजी घ्या.
२. अचानक पाऊस वाढल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा.
३. पाण्याचा प्रवाह वाढल्यास, कमी होण्याची वाट बघा.
४. प्रवाह कमी झाल्यावरच वॉटरक्रॉसिंग करा.
५. आवश्यक साधनं आणि मदत साहित्य जवळ ठेवा.
६. ट्रेकिंगला नेहमी Trekking ग्रुपसोबत जा.
७. अशा स्थितीत घाबरू नका, शांतता राखा.