DRDO RAC Recruitment 2023 Vacancy: डीआरडीओच्या रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटरअंतर्गत (RAC) विविध विषयांमध्ये 181 वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे.

संस्थेने जून 2023 मध्ये (10-16) एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये या पदांसाठी तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. या मेगा भरती मोहिमेसाठी नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. ही जाहिरात 25 मे रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की RAC वेबसाईटवरील ऑनलाईन नोंदणी 21 दिवसांच्या आत बंद होईल.

👉सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा

एकूण 181 वैज्ञानिक बी पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून तुम्हाला यापैकी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मटेरियल इंजिनिअरिंग / मटेरियल सायन्स आणि इंजिनिअरिंग / मेटलर्जिकल इंजिनिअरिंग अशा विविध विषयांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (DRDO) पे मॅट्रिक्सच्या (Rs.56,100/-) लेव्हल-10 मध्ये (7वी CPC) विविध विषय आणि श्रेणींमध्ये वैज्ञानिक ‘B’ च्या एकूण 181 पदांसाी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

रिक्त पदांचा तपशील (DRDO RAC Recruitment 2023)

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – 49 पदे
मेकॅनिकल इंजिनिअरिंग- 44 पदे
कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग – 34 पदे
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 05 पदे
मटेरियल इंजिनीअरिंग/मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग/

मेटलर्जिकल इंजिनिअरिंग – 10 पदे
फिजिक्स – 10 पदे
केमिस्ट्री – 05 पदे
केमिकल इंजिनिअरिंग – 13 पदे
एरोनॉटिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग – 07 पदे
गणित – 02 पदे
सिव्हिल इंजिनिअरिंग – 02 पदे

आवश्यक पात्रता आणि निकष
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या अधिसूचनेवरून तुम्ही पाहू शकता. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, जनरल आणि इडब्ल्यूएससाठी वयोमर्यादा 28 वर्षे आहे, तर आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल. (Recruitment News)

अर्जाचे शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी पुरष श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एसटी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

👉सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!