राज्यात पुढचे पाच दिवस अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान अंदाज
मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे 14 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील पंधरवड्यात दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे.

Unseasonal Rain: हवामान खात्याचा अंदाज काय?

आज नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

15 मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16 मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

16 मार्च रोजी महाराष्ट्रात कोकणासह सर्वत्रच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

16 मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

16 मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील तीन ते चार तासात राज्यभर हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता

मेघगर्जनेसह वादळ आणि येत्या तीन ते चार तासात जळगाव जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

नागपुरात तुरळक ठिकाणी गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: RTE अंतर्गत इंग्लिश स्कूल मध्ये मोफत प्रवेश शेवट तारीख येथे करा अर्ज

गाई म्हशी साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!