राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. तब्बल ४ कोटी १७ लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. Loan waiver list

यात, एकट्या जामनेर तालुक्यातील ६७७ शेतकरी असून, चाळीसगाव तालुक्यातील ७० शेतकरी आहेत. धरणगाव तालुक्यातील केवळ एक शेतकरी लाभार्थी आहे.

👉तालुकानिहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत शासनाच्या सहकार विभागाने जळगाव जिल्हा बँकेला कर्जमाफीचे पत्र दिले आहे. पोर्टल सुरू असताना या शेतकऱ्यांच्या रकमा चुकीच्या भरण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर योग्य रक्कम भरून त्या पाठविण्यात आल्या होत्या. त्या आता मंजूर होवून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. कापूस, केळी, ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी, पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या रकमा भरण्यात आल्या होत्या.

👉तालुकानिहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र, त्या चुकीच्या भरण्यात आल्याने त्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. त्या रकमा पुन्हा व्यवस्थित भरून त्या पाठविण्यात आल्या. त्यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ६७७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. Loan waiver list

उर्वरीत लाभार्थ्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव तालुक्यातील दोन, तर धरणगाव तालुक्याला फक्त एका शेतकऱ्याचा समावेश आहे. यावल तालुक्यातही एकाच शेतकऱ्याचा समावेश आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. तर मुक्ताईनगर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे.

👉कर्जमाफीच्या गावानुसार याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!