शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापसाचे भाव आता कमी होणार नाही, मिळणार एवढा बाजार भाव cotton market price today

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या हांगामात कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

परंतु गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी कापसाला खूपच कमी भाव मिळत आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच सध्याच्या घडीला देशातील एकूण उत्पादनाच्या 50% कापसाची विक्री झाली असून आणखी अर्धा कापूस तसाच शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे.

कापसाचे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यात किती?

म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील शेतकऱ्यांनी 160 लाख कापूस गाठीची विक्री केली आहे. व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार होळीनंतर कापसाची विक्री वाढेल दरम्यान काल झालेल्या लिलावात मात्र कापसाची आवक नरमलेली होती. cotton rate today

फेब्रुवारी महिन्यापर्यंत तब्बल आठ लाख कापूस गाठी निर्यात झाल्या आहेत. त्यामुळे आजून किमान 22 लाख कापूस गाठी निर्यात होऊ शकतात असा अंदाज आहे.

या हंगामात तीस लाख कापूस गाठी निर्यात होईल असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या बरोबरच काही ठिकाणी सध्या जागतिक बाजारात कापूस दरात चढ-उतार पहावयास मिळत आहे.

cotton market today काल देशांतर्गत 7800 ते 8300 दरम्यान कापसाला भाव मिळाला. परंतु यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासूनच सूतगिरण्या पूर्णपणे सुरू झाल्या नाही.

जाणून घ्या सध्याचे कापसाचे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यात किती?

सध्या देशामध्ये 80% क्षमतेने सूतगिरण्या सुरू आहेत. परंतु बांगलादेशमध्ये कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही तज्ञांकडून भारतीय कापूस सध्या स्थितीला जागतिक कापसाच्या तुलनेत महाग असल्याने निर्यातीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

परंतु कारण काहीही असलं तरी गेल्या हंगामा प्रमाणे या हंगामात कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळणार नाही. कापूस ८५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या बाजार भावात विक्रीसाठी पोषक परिस्थिती आहे. cotton market today

👉सर्व गावातील राशन कार्ड यादी पहा ऑनलाईन

मोठी बातमी! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; सानुग्रह अनुदान जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!